Posts

Showing posts from April, 2022
 एक में  (संदर्भ मी महेश पवार किशोर कदम इन अपना धाबा ) श्रीधर तिळवे नाईक  १ भक्त प्रसाद खातायत  आणि देव उपाशी आहेत  रंग उडून गेलेल्या पिसांचा पिसारा पहात  आयुष्याचा मोर नाचतो आहे  प्रवासाच्या शेवटी नॉशिया आलाय प्रवाशाला  आणि बुलेट ट्रेन कुठेच पोहचलेली नाही  कयामतीपर्यंत काया माती खात राहणार काय ? मेड्युसा ह्या देशातील कशाकशाला दगड बनवणार आहे ? कि देशच स्वतःला दगड बनवून थांबणार आहे ? २ एक मे म्हणजे श्रमिकांचा उत्सव  आणि श्रमिकांना आता त्याचा विसर पडलाय  एक मे म्हणजे मराठी बोलणाऱ्यांचा उत्सव  आणि मराठी लोकांना मराठी भाषेचा मराठी कण्याचा विसर पडलाय  मराठी फक्त श्रमिकांची भाषा बनलीये काय ? मराठी राज्य हे फक्त श्रमिकांनी स्थापन केलेलं राज्य होतं का ? एक मे आलाय २४ एप्रिलला माझ्या दारी  महेश पवारच्या मागोमाग  मला कळत नाहीये  महेश एक मे आहे कि  कि एक मे महेश पवार आहे ? ३ एक मे म्हणतोय  चल चल अपना ढाबा जाऊ  मी पितो आणि आपण मस्त जेऊ  मी म्हणतोय  मॅच आहे आयपीएलची  एक मे ठाम  तू अजूनही क्रिकेट बघतो ? तिकडे सर्वत्र मॅच आहे तिकडे बघ  मी म्हणतो पूजा येतीये का बघ  आज कामगार दिन आहे माहीत नाही का  तिल