मोक्ष : टाईट इफेक्ट
जनरेशन z साठी श्रीधर तिळवे नाईक १ तुम्ही येण्यापूर्वी बरच काही घडलं होतं महत्त्वकांक्षेला गरुड फुटण्याऐवजी मर्डर फुटला होता सत्तेवर शिवाजी महाराजांनी येण्याएवजी केवळ गणपतीला केला जाणारा देखावा आला होता आणि तो दरवर्षी बदलत होता एक उद्दामपणा उड्डाणपणा म्हणून सेटल झाला होता एक खोटा गर्व वर्णाच्या अहंकारात लोळत होता राजकीय अचूक राहण्याची माझी क्षमता संपत चालली होती मी एक्झॉस्ट होणार होतो आणि मला तडाखा मारला जात होता तुम्ही येण्यापूर्वी बरंच काही घडत होतं २ मी तंत्र शिकवत होतो आणि तिकडे अशोक वृक्षाखाली एक निवडुंग उगवत होता एक दैदीप्यमान मोक्षता आणि दुसरीकडे भोंगळ वक्षता दक्षतांचा सारा खटाटोप फक्त टोप्या घालणारा लेडीज सूर्योदय हिडीस सूर्यास्त बनत चाललेला ज्याला त्वचाही कळत नव्हती तो आत्म्यावर आरुढ प्राण जाण्याची वेळ आणि घड्याळे तुटत चाललेली ब्लॅकमेल म्हणून केले गेलेले व्हिडिओ व्हाईट कॉल म्हणून परतलेले आता या व्हाईट कॉलर लोकांचे...