विसाव्या शतकात शैव लोकांनी आपण हिंदू धर्माचे भाग आहोत हे का स्वीकारले श्रीधर तिळवे नाईक
हा एक असा प्रश्न आहे जो मला सातत्याने विचाराला जातो आणि हा अनेकदा आचार्य श्रीधर तिळवे यांना विचारला जातो त्याचे उत्तरही मी शैव आचार्य म्हणून अनेकदा दिलेले आहे. आता पुन्हा देतो .
सर्वात प्रथम आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे ब्रिटिशांचा सर्वात शेवटचा लढा जो झाला तो मुस्लिमांशी झाला नाही तो शैव धर्मी लोकांशी झाला दक्षिणेमध्ये होळकर घराणे आणि उत्तरेमध्ये शीख लोकांनी ही लढाई शेवटपर्यंत लढण्याचा प्रयत्न केला त्यानंतर सुद्धा वेगवेगळ्या आदिवासी जमाती ज्या मूळच्या शैवच आहेत त्या कायमच ब्रिटिश सत्ते विरोधात बंड करत राहिल्या . याला प्रथम छेद दिला तो महात्मा फुले यांनी त्यांनी प्रथमच स्पष्ट आणि स्वच्छपणे स्वीकार केला की ही लढाई आता शक्य आहे आणि ब्रिटिशांच्या विरोधात त्यांनी पूर्णपणे शस्त्र त्याग केला त्याचा फार खोलवर परिणाम होत गेला p कधी नव्हे तो शैव लोकांनी आपला लढण्याचा धर्म म्यान केला शस्त्र बाजूला ठेवली हे फार चांगले झाले असे मला कधीही वाटले नाही किंबहुना महात्मा फुले यांनी असे काहीतरी करून संपूर्ण शैव धर्म स्वीकारताना स्पर्धेमधून बाद केला . खुद्द महात्मा फुले यांना फार पाठिंबा नंतरच्या काळात मिळालेला नाही याचे सर्वात मोठे कारण त्यांनी स्वातंत्र्यलढा उभा करणे ऐवजी ब्रिटिशांशी केलेली तडजोड आहे . ही तडजोड फक्त राजकीय पातळीवर नव्हती तर धार्मिक पातळीवर सुद्धा त्यांनी केली होती आणि म्हणूनच सत्यशोधक समाज सुद्धा फारसा लोकप्रिय झाला नाही आत्ताच्या लोकांनी कितीही सामाजिक सुधारणा आली असे म्हटले असले तरी प्रत्यक्षामध्ये लोकांना मात्र हे पटलेले नव्हते लोक हे स्वातंत्र्याच्या बाजूने होते आणि म्हणूनच टिळक गांधी विरुद्ध फुले आगरकर आंबेडकर यांच्या हयातीत यांच्यातील संघर्षात कायमच लोकांनी प्रथम टिळक आणि नंतर गांधीजींच्या मागे जाणे पसंत केलेले आहे . या मुख्य लढाईतच शैवधर्म उतरला नाही आणि त्याचा फार मोठा परिणाम क्षैव मानसिकतेमध्ये घोंगावत राहिला आज सुद्धा शैव मानसिकता कायमच सत्ताधारी लोकांशी तळजोड करण्याच्या मनोवृत्तीत वावरते याचे कारण फुले यांनी दिलेला हा अराजकीय म्हणजे राजकारणापासून स्वातंत्र्य मिळवण्यापासून दूर राहण्याचा संस्कार आहे . माझे स्वतःचे स्पष्ट मत आहे की ओबीसींनी आता सत्ताधारी बनणे गरजेचे आहे तेव्हा सत्ता मिळवा शासन मिळवा प्रशासन मिळवा त्याशिवाय पर्याय नाही याबाबतीत आता फुले यांना आपण विसरून जावे हे उत्तम ! शिका लढा संघटन करा आणि शासकीय प्रशासकीय सत्ता व्हा संपत्ती मिळवा संघटन करा आणि धनसत्ताधारी व्हा . असो.
मात्र महात्मा फुले यांचे अनेक बाबतीत आपल्यावर ऋण आहे तेही आपण लक्षात ठेवले पाहिजे महात्मा फुले यांनी कायमच शैव धर्म हा युरेशियन श्रुतीपेक्षा आर्य लोकांच्या पेक्षा वेगळा आहे ही मांडणी सतत ठेवली आणि ज्याला ख्रिश्चन शैव धर्म म्हणता येईल असा सत्यशोधक समाज स्थापन केला. त्यांनी ईश्वरा ऐवजी निर्मिक असा शब्द वापरला आणि तो क्रियेटर या शब्दाचा एका अर्थाने अनुवाद होता . मात्र त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांनी मात्र आपल्या कवितांच्या मधून शेवटपर्यंत शैव-धर्म जागृत ठेवला ज्याला आज आपण देशीवाद म्हणतो त्या देशी वादाची सुरुवात सुद्धा शैव देशीवादापासून होते आणि हा शैव देशीवाद महात्मा फुले यांच्यापासून सुरू होतो . त्यांनीच प्रथम खंडोबा ज्योतिबा यांच्याकडे लक्ष दिले आणि त्यांना देशीवादी दैवत म्हणून मान्यता दिली .
१८८० नंतर मात्र महात्मा फुले यांचा प्रभाव कमी होत गेला कारण ब्रिटिशांना मुळात शैव धर्म नको होता कारण हा धर्म लढतो हे त्यांना कळून चुकले होते . त्यामुळे साहजिकच सर्वत्र शैव धर्माची पीछेहाट सुरू झाली आणि ती नंतर ब्राह्मण धर्माने अधिकाधिक फायदा घेतल्यामुळे रसातळाला गेली . याचा थेट परिणाम विसाव्या शतकात झाला आणि या विसाव्या शतकात नेमका नववैष्णववाद काँग्रेस मुळे केंद्रस्थानी आला . शैव विरुद्ध वैष्णव हा संघर्ष प्रामुख्याने वर्ण जाती व्यवस्थेमुळे जास्त ज्वलंत बनला होता पण ब्राह्मण वादाने मुळातच शंकर स्वीकारला आणि मुळातच हिंदू धर्म निर्माण करत त्याला हिंदू धर्मामध्ये दोन मुख्य जागांच्यापैकी एक जागा द्यायला सुरुवात केली आणि वैष्णव आणि शैव हे दोन एकाच हिंदू धर्माचे दोन पंथ आहेत अशी नवीन मांडणी पुढे आणायला सुरुवात केली . संतांच्या चळवळीमध्ये याला थोडीशी जागा होती आता फार मोठा अवकाश उपलब्ध करून देणे सुरू झाले . याचवेळी महात्मा गांधींचा उदय झाला आणि त्यांनी हळूहळू वर्णव्यवस्था नाकारायला सुरुवात केली मुळातच राजकीय नेतृत्व ब्राह्मणांच्याकडे राहिले नाही आणि साहजिकच सगळे शैव हे हिंदू म्हणून महात्मा गांधी यांच्या मागे गेले . खुद्द काँग्रेसने सुद्धा अनेक वैचारिक माध्यमातून हिंदू धर्म हा शैव आणि वैष्णव या दोन पंथांचा धर्म म्हणून प्रमोट केला. त्यामुळे कागदोपत्री सुद्धा शैवांची स्वतंत्र ओळख वैष्णवांची स्वतंत्र ओळख नाहीशी झाली आणि दोघेही स्वतःला हिंदू म्हणवून घेऊ लागले साहजिकच शैव हिंदू झाले .
खुद्द युरोपियन इतिहासकारांनी आणि युरोपियन विचारवंतांनी सुद्धा या काळामध्ये शैव हा धर्म प्राचीन असल्याचे नाकारत त्याला हिंदू धर्माचा भाग बनवले . याचे एक मोठे कारण असेही होते की सिंधू संस्कृतीचा शोध लागलेला नव्हता त्यामुळे शैव-धर्म प्राचीन आहे हे सिद्ध करायला जितके पुरावे आवश्यक होते तितके मिळत नव्हते सिंधू संस्कृती सापडल्यानंतर मात्र झपाट्याने सर्व गोष्टी बदलत गेल्या आणि वैदिक संस्कृतीच्या आणि ब्राह्मण संस्कृतीच्या आधी सुद्धा एक अनाऱ्यांची म्हणून स्वतःची शैव संस्कृती अस्तित्वात होती हे स्पष्ट झाले . मात्र तरीही काँग्रेसने जबरदस्तीने शैव लोकांना स्वतंत्र दर्जा देणे नाकारत त्यांना हिंदू धर्माचा भाग ठेवत त्यांच्यावर जबरदस्ती केली आणि त्यांच्यावर वैदिक आणि ब्राह्मणी व्यवस्था वैष्णव संस्कार करत लादण्याचा प्रयत्न केला . याच काळामध्ये आंबेडकरांच्या सारखा थोर विचारवंत सुद्धा ब्राह्मणी व कॉलोनीयल प्रभावाखाली येऊन हिंदू धर्मामध्ये शैव धर्माचा समावेश करत होता या सगळ्याचा परिणाम असा झाला की ही प्रचार यंत्रणा यशस्वी झाली आणि शैव स्वतःची ओळख विसरले . शैव पंडित व वीर लोक सुद्धा जे अभिमानाने हर हर महादेव मानत होते आपण वर्ण जात व्यवस्था निर्माण केलेली नाही ही गोष्ट विसरले आणि वर्ण जात निर्माणाच्या बाबतीत गिल्ट फिल करत राहिले .
या वर्णवादी विचारसरणीचा प्रभाव इतका प्रचंड होता की स्वतःला ब्राह्मण आणि क्षत्रिय म्हणवून घेणे शक्य नसेल तर निदान आपण प्राचीन काळात ब्राह्मण आणि क्षत्रिय होतो असे म्हणवून घेणे गरजेचे वाटायला लागले आणि यातूनच मग आंबेडकरांच्या सारखा प्रज्ञावंत मनुष्य सुद्धा अस्पृश्यांच्या क्षत्रियकरणांचा सिद्धांत मांडायला लागला ते मूळचे क्षत्रियच होते असे सांगू लागला प्रत्यक्ष व्यवहारांमध्ये मात्र कुठल्याही प्रस्थापित युरेशियन क्षत्रियांनी त्यांना स्वीकारले नाही कारण मुळात हे अस्पृश्य शैव वीर लोक होते किंवा शैव उत्पादक लोक होते . याचा एक दुष्परिणाम असा झाला की या सगळ्यामुळे शैव ओळख महात्मा फुले यांच्यानंतर कंटिन्यू ठेवण्याची जबाबदारी ज्या नेतृत्वावर होती त्या नेतृत्वानेच म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर यांनीच आणि पुढे त्यांच्या बरोबर असणाऱ्या लोकांनी ही कंटिन्युटी नाकारली आणि स्वतःला हिंदू म्हणवून घ्यायला किंवा नाकारायला सुरुवात केली किंवा बौद्ध म्हणवून घ्यायला सुरुवात केली .
यामुळे जेव्हा शैव होण्याची शक्यता असलेले नेतृत्वच युरेशियन श्रुतीच्या दारात दाखल झाले आणि जेव्हा तुमचे नेतृत्व युरेशियन श्रुतीच्या दारात दाखल होत तेव्हा मग ते आपोआपच त्यांच्या तालावर नाचायला लागते दलित चळवळीची सारी शोकांतिका ही यामध्ये लपलेली आहे जिच्या विषयी कोणीही बोलत नाही . यामुळेच जे पंडितांचे झाले तेच दलितांचे झाले आपण कधी युरोशियन बनलो हे त्यांना कळालेही नाही. यामुळे सर्वजण हिंदू झाले आणि हिंदूंना विरोध करणारे सुद्धा शैव लोकांना हिंदू समजू लागले .
शैव लोकांचे दुसरे नेतृत्व शाहू महाराज होते त्यांनी सुद्धा अचानक आर्य धर्म स्वीकारला आणि ते वैदिक श्रुती मध्ये थेट दाखल झाले . संघर्ष फक्त ब्राह्मण विरुद्ध क्षत्रिय एवढाच राहिला . यातल्या एकाही ठिकाणी ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्यापैकी एकाही वर्णाशी आपला काहीही संबंध नाही ही मूलभूत गोष्टच विसरली गेली त्यातूनच मग वेदोक्त की पुराणोक्त हा वाद झाला यामध्ये हे लक्षातच आले नाही की आपण वेदोक्त होवो किंवा पुराणोक्त होवो अंतिमतः वर्ण व्यवस्थेत येतो .
या सगळ्याचा सर्वात मोठा परिणाम जर काही झाला असेल तर तो म्हणजे युरेशियन लोकांना आणि संस्कृतींना विरोध करणारा मुख्य विरोधकच हळूहळू नाहीसा व्हायला लागला आणि हिंदूधर्म स्थापनेचा जो हेतू होता तो साध्य होऊ शकला. नकुलीश, कपिल,जैन आणि बौद्ध यांचे धर्म हे क्षत्रिय लोकांनी प्रामुख्याने स्पॉन्सर केलेले धर्म होते ते नाहीसे करण्यासाठी म्हणून ज्याप्रमाणे वासुदेव धर्मापासून वैष्णव धर्म निर्माण करण्यात आला आणि त्यांना नाहीसे करण्यात आले त्याचप्रमाणे शैव-धर्म नाहीसा करण्यासाठी म्हणून हिंदू धर्म जन्माला घालण्यात आला आणि शैवधर्म नाहीसा करण्याचा प्रयत्न जवळ जवळ यशस्वी झाला .
याचा अर्थ शैवदर्शने गप्प बसली होती का ? तर नाही पण त्यांना शेवटपर्यंत मान्यता दिली गेली नाही भारतीय दर्शनांची षड दर्शने म्हणून नेहमीच युरेशियन श्रुती मधील सहा दर्शने सादर करण्यात आली . सांख्य आणि योग ही मूळची शैव दर्शनांच्या पासून निर्माण झालेली दर्शने शैव धर्माशी नाते तोडून सादर करण्यात आली . म्हणजेच बहुजन समाजाची जी दर्शने आहे त्यातले अगदी महाजन लोकांच्यात लोकप्रिय असणारे पशुपत दर्शन ज्याच्यातून बसवेश्वर आणि आद्य शंकराचार्य आले त्या दर्शनाला सुद्धा या लोकांनी षड दर्शनांच्या मध्ये मान्यता दिली नाही इतके हे लोक धूर्त होते आणि भयग्रस्त होते . एकटे पाशुपत दर्शन जरी आले तरी ते मग संपूर्ण शैव धर्म घेऊन येतील याची यांना खात्री होती. महाराष्ट्रामध्ये सुद्धा नाथधर्म गाळून टाकण्यासाठी म्हणूनच वारकरी संप्रदायाची निर्मिती करण्यात आली आणि विसाव्या शतकामध्ये ती पद्धतशीरित्या वाढवण्यात आली .
या सगळ्या राजकारणामध्ये आणि धर्मकारणा मध्ये शैव धर्म जवळजवळ नाहीसा होईल नाहीसा झाला असे चित्र तयार झाले पण प्रत्यक्षामध्ये ते फळले नाही याचे कारण बहुजन समाजातून असलेली मुळे उखाडून टाकणे या लोकांना जमले नाही . शंकर पुन्हा परत आला आणि यामध्ये काही प्रमाणामध्ये का होईना परंतु बॉलिवूडचाहिर वाटा मोठा होता . सगळे संतप्त हिरो हे कायमच शंकराचे भक्त असल्याने ते तसे दाखवले गेले आणि जिथे जिथे मुस्लिम लेखक होते त्यांना एक गोष्ट नीट माहीत होती ती म्हणजे या देशातल्या हिंदू बहुजन समाजाचा धर्म शैवधर्म आहे कारण त्यांनी तो तसा रोजच्या आयुष्यात पाहिला होता . त्यामुळे शोले असो की दीवार असो की बाहुबली असो सर्वत्र भगवान शंकरच अवतरत राहिले .
आज पुन्हा एकदा शैव धर्म संपूर्ण जगभरच उदयाला यायला लागला आहे कारण मुळात शैव लोकांनी मांडलेले अनेक सिद्धांत हळूहळू पुढे यायला लागले मुख्य म्हणजे त्यांनी जे सांगितले होते त्यातले काही भाग वैज्ञानिक ठरायला लागले कारण क्वांटम ज्ञानाचा उदय झाला आणि हे क्वांटम आणि पोस्टक्वांटम विज्ञान भारतातल्या इतर कुठल्याही धर्मापेक्षा शैव धर्माशी अधिक निगडित होते शैव श्रुतीशी निगडित होते
याचे दुसरे महत्त्वाचे कारणच अर्थात द्रविड संस्कृतीची उदयाला आलेली कल्पना! त्यामुळे दक्षिणात्य संस्कृतीने आपली पाळीमुळे घट्ट ठेवली आणि भगवान शंकर आणि शैव-धर्म कायमच शाबूत ठेवला . स्कंदाला मुरुगन वगैरे करत व्यवस्थित शाबूत ठेवले . आपल्याकडे मात्र खंडोबालाच म्हणजेच कुमार स्कंदला शंकर करून टाकले . नंतर नंतर तर काही अतिशहाण्या लोकांनी जे सिद्ध पुरुष होते त्यांना त्यांच्या मंदिरात सुद्धा शंकर म्हणायला सुरुवात केली किंवा शंकराचा अवतार करून टाकले.
या सर्व घडामोडी मध्ये शैव धर्म अजूनही टिकून राहिलेला आहे आणि आता त्याचे पुन्हा पुनर्जीवन झाले तर आश्चर्य मानू नये
मात्र एक गोष्ट आपण सर्वांनीच लक्षात ठेवावी की आपण शेवटी सर्व इंडियन धर्म आहोत. जे जे इंडियात जन्मलेले धर्म आहेत त्यांनी आपली इंडियन आयडेंटिटी सोडण्याची काहीही गरज नाही जर इंडियन म्हणजेच हिंदू असेल तर हिंदू ही ओळख सुद्धा सोडण्याची काहीही गरज नाही त्यामध्ये भारतात जन्मलेले सर्व धर्म येतात आणि युरोशियन लोकांनी सुद्धा येथे जे धर्म जन्माला घातलेले आहेत ते शेवटी इंडियनच आहेत त्यामुळे मी नेहमीच सांगतो की आत आपण वेगळे असलो तरी बाहेरच्याशी लढताना आपण १०५ असलो पाहिजे आणि एकत्रच लढलो पाहिजे .
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment