आदि शैव श्रुती श्रीधर तिळवे नाईक 


शैव श्रुती ही जगातली सर्वात पहिली श्रुती आहे आणि तिचा उगम सुद्धा आता सापडत नाही इतकी ती प्राचीन आहे त्यामुळेच आता जे काही वर्तमान आहे त्यातून योग्य तो निष्कर्ष काढावा लागतो अनेकदा मला विचारले जाते की आदिशैव धर्म होता म्हणजे काय होता तर त्याचा प्राचीन टप्पा खरे तर अति प्राचीन टप्पा सर्वात प्रथम लक्षात घेणे गरजेचे आहे आणि त्यासाठी आदिवासी संस्कृती समजून घेणे आवश्यक आहे त्याशिवाय तो कळत नाही .


भारतामध्ये सर्वांना शंकर ही देवता माहिती आहे पण तिचा उगम कुठून आला हे अनेकदा माहीत नसते . शंकर या शब्दाचा मूळ अर्थ शंका घेणारा असाच होता आणि हे नाव त्याला नंतर मिळाले हे मी मागेच एका लेखात सांगितलेले आहे त्याचे मूळ नाव शंभू ज्याला आता मराठीत आपण संभाजी म्हणतो कारण शिवाजी महाराजांच्या लाडक्या पुत्राचे ते नाव होते . आज सुद्धा शंभू हे नाव भारतामध्ये सर्व वर्ण जाती आणि भारतीय धर्मांच्या मध्ये आवडीने ठेवले जाते याचे कारण शंकरावर भारताचे सर्वाधिक परिणाम आहे प्रेम आहे हे प्रेम नष्ट करण्याचे सर्व नटदृष्ट उद्योग करण्यात आले परंतु ते टिकले नाहीत . ज्या ताटात खाल्ले त्याच ताटात डॅश डॅश डॅश असेही काही हलकट लोकांच्या बाबतीत घडलेले आहे . त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे जास्त चांगले म्हणत आम्ही दुर्लक्ष करत राहिलो परंतु हे लोक अजूनही सुधारण्याचे नाव घेत नाही आणि शंकरांची बदनामी करत राहतात असो.


आदिवासी लोकांच्यात देव म्हणजे पूर्वज असा पूर्वज जो फार काहीतरी मोठे असे देऊन गेला .देवी याचा अर्थ सुद्धा देणारी असाच आहे . हा शब्द नंतर भारतातून जवळ जवळ सर्वत्रच पसरलेला दिसतो . याचे कारण आदिवासी लोकांच्या मध्ये काही लोक भटकेही होते जे थेट युरोप पर्यंत जात होते रशियात जात होते .


या श्रुतीमध्ये शंकराचे स्थान केंद्रस्थानी आहे आणि आदिवासी संस्कृतीमध्ये आज सुद्धा त्याचा उल्लेख पाच पद्धतीने होतो 


१ शंभू देव : हे क्रिया तंत्रातील लोकांनी दिलेले नाव आहे ज्या व्यक्तीला क्रिया करत युरेशन श्रुतीच्या भाषेत कर्म करत जगायचे आहे तिच्यासाठी अनेकदा हेच नाव योग्य मानले जात होते. आदिवासी राजालाही हे नाव मिळत होते कारण त्याला कर्म अटळ होते या तंत्राला फॉलो करत नंतर जवळजवळ 88 शंभू झाले असे म्हटले जाते यांनाच पुढे सिद्ध म्हटले गेले आणि सिद्धांच्या विषयीच्या दंतकथा भारतातल्या सर्व धर्मामध्ये प्रचलित झाल्या मूळचे हे सर्व आदिवासी राजे होते शैव धर्म अनेकांना नकोसा झालाय त्याचे कारण त्याचे मूळ आदिवासी संस्कृतीमध्ये आहे कारण तो सर्वात प्राचीन असा धर्म आहे श्रुती आहे वास्तविक त्याच्या इतका उत्क्रांत झालेला धर्म इतरत्र दिसणार नाही म्हणजे ज्यू आणि इस्लाम हे दोन्ही धर्म मूळचे जमाती आहेत परंतु त्यांच्यात तुम्हाला उत्क्रांती दिसणार नाही कारण कोणीही मोक्षाला पोचले नाही त्यांना मोक्षच माहीत नाही परंतु शैव लोकांच्या मध्ये मात्र सातत्याने उत्क्रांती झाल्याने नवीन नवीन वर्जन तयार झाले कारण मोक्षाची वाट खुली होती . तिसरा डोळा उघडा होता .

२ शेख देव: शेख या शब्दाचा अर्थ आज सुद्धा टिकून आहे वृद्ध आणि उपदेश देणारी पूजनीय व्यक्ती हा त्याचा मूळ अर्थ ! यातूनच शेठ हा शब्द नंतर आला आणि संस्कृत मध्ये मग तो श्रेष्ठ असा झाला हे लोक राजसत्तेचे किंवा धन सत्तेचे उपासक आणि ही उपासना करता करताच शक्तीच्या साह्याने तंत्राच्या साह्याने मोक्ष मिळवणे हे आयुष्याचे उद्दिष्ट ! हे लोक मोर्चा मोर्चे मूळचे वाणी होते म्हणजेच वनाच्या जवळ राहणारे ! जंगलातील पदार्थांचे वहन करणारे आणि त्यांना शहरात जाऊन विकणारे ! व्यापाऱ्याच लोकांनी सुरू केला आणि त्यांच्यामुळेच विविध गणातल्या वस्तू एकमेकांना मिळायला लागल्या . वनात न राहता वनाच्या शेजारी राहणारे म्हणून वानी ! त्याचेच पुढे वाणी झाले . यांच्यातूनच पुढे पणी झाले ज्यांनी पाण्यावरून वहन करण्याची विद्या विकसित केली आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराला सुरुवात केली . हे लोक थेट सीरियापर्यंत पोहोचले होते हे आता स्पष्ट होते आहे त्यांना तिकडे फिनिशन म्हणत . पुढे यांच्यात सुद्धा पूजा सुरू झाली आणि शक्तीची पूजा भगवती म्हणून जास्त होऊ लागली प्रथम भगवती हा शब्द आलेला आहे त्यावरून मग भगवान हा शब्द आलेला आहे पुढे तो बौद्धांच्यात भगवा एवढाच झाला 

शक्ती तंत्र साधना करत जो भगवतीची पूजा करतो तो भगत होय . वास्तविक केवळ पूजा करायला मनाई केली होती उपासना करायला सांगितले होते पण मांत्रिकीचा पीळ सुटला नाही आणि हे लोक ब्राह्मणांच्याप्रमाणे शेवटपर्यंत मांत्रिकी करत राहिले तंत्र बिघडवण्यात सर्वाधिक वाटा यांचा आहे. आजही चेतन भगत वगैरे रूपाने भगत आडनाव अनेक ठिकाणी दिसेल आठव्या शतकानंतर जवळजवळ सर्वच भगत ब्राह्मण झाले आणि ब्राह्मण धर्माला जाऊन मिळाले या लोकांनी ब्राह्मण धर्मातला वर्णाश्रम सामान्य जनतेमध्ये प्रस्थापित करण्यासाठी ब्राह्मण धर्मांना मदत केली. मात्र तरीही स्वतःची उपासना सोडलेली दिसत नाही ती अनेकदा शक्ती म्हणून केली जाती आणि अनेकदा मंदिराचा मोह सुटत नाही वास्तविक तुम्ही एकदा धर्म सोडल्यानंतर त्या धर्मामुळे मिळालेली मंदिरे सुद्धा सोडायला हवीत पण तसे भारतात झालेले नाही हे लोक आता स्वतःला ब्राह्मण म्हणवून घेतात आणि पूजा करत बसतात .

३ बडा देव : भगत मधूनच भक्त निर्माण झाले या लोकांनी भाव तंत्र स्वीकारले त्यांनी बडा देव निर्माण केला आणि अनेकदा मूर्तिपूजा सुद्धा सुरू केली यातील बडा हा शब्द वडापासून तयार झालेला आहे वडाप्रमाणे जो अत्यंत मोठा आणि सर्वत्र फांद्या ठेवून आहे पारंब्या ठेवून आहे असा तो बडा देव आहे त्यामुळेच त्याची अनेकदा मूर्तिपूजा म्हणून साक्षात वडाची पूजा केली जात होती आणि वटवृक्ष हा शिवलिंगच मानला जात होता ज्यातून वटपौर्णिमा वटसावित्री झाली त्यामुळेच नंतर सुद्धा ही मूर्ती पूजा फार वेगळी होती पुढे बडा देव याचाच संस्कृत मध्ये महादेव झालेला आहे यांचे मोक्ष मिळवण्याचे मुख्यतंत्र भक्ती तंत्र आहे. भक्तीचा सर्वाधिक प्रसार या लोकांनी केला आणि पाचव्या शतकापासून भक्ती केंद्रस्थानी यायला सुरुवात झाली .भगत मधूनच भक्त निर्माण झाले या लोकांनी भाव तंत्र स्वीकारले त्यांनी बडा देव निर्माण केला आणि अनेकदा मूर्तिपूजा सुद्धा सुरू केली मात्र ही मूर्ती पूजा फार वेगळी होती पुढे बडा देव याचाच संस्कृत मध्ये महादेव झालेला आहे यांचे मोक्ष मिळवण्याचे मुख्यतंत्र भक्ती तंत्र आहे. भक्तीचा सर्वाधिक प्रसार या लोकांनी केला आणि पाचव्या शतकापासून भक्ती केंद्रस्थानी यायला सुरुवात झाली .


४ लिंगदेव: मी हे अनेकदा सांगितले आहे की शिवलिंग शक्ती लिंग आणि ईश्वरलिंग हीच तीन लिंगे महत्त्वाची ! ही प्रामुख्याने योगी लोकांच्यासाठी देण्यात आलेली आहेत. योगामधून ज्याला ऍक्च्युली जोग म्हटले जाते त्याने मागितलेल्या भिक्षेला जोगवा म्हटले जाते आणि साधकाला जोगी जोगन म्हटले जाते . यातूनच योगतंत्र विकसित होत पुढे एक नवीन धर्म सुद्धा निर्माण झाला ज्याला आपण नाथधर्म म्हणतो कारण जो जोगी मोक्षाला उपलब्ध होतो जो सिद्ध बनतो त्याला नाथ म्हटले जाते आपल्याकडे प्रथम नाथ आणि नंतर नवनाथ धर्म निर्माण झालेला दिसतो यात प्रामुख्याने शिव तत्वाची शून्यलिंग म्हणून पूजा होते आणि लिंग देणारा तो लिंग देव होय त्यामुळेच पुरोहिताला सुद्धा लिंगार किंवा लिंगो म्हटले जात होते याचेच वेगवेगळे अपभ्रंश आपणाला आदिवासी भाषांच्यातून दिसतात 

५ बुढा देव: हा शब्द प्रामुख्याने ज्ञानतंत्राद्वारे जे आदिवासी लोक साधना करत होते त्यांनी शोधलेला आहे यात सर्वाधिक महत्त्वाचे ज्ञान होय . यातूनच पुढे बुद्ध हा शब्द तयार झालेला आहे जो नंतर सिद्धार्थ गौतम साठी वापरण्यात आला सिद्धार्थ गौतम हा फक्त शैवधर्मातून चालत आलेली लिंक आहे नंतर त्यातून अनुयायांनी स्वतंत्र धर्म निर्माण केला . तो बुद्धाच्या नंतर दोन शतकांनी निर्माण झालेला धर्म आहे त्यामुळे अगदी पेटाऱ्यांच्या मध्ये (पीटक) सुद्धा काही घाल आणि घुसळ झालेली आहे . अपवादात्मक वेळेला चमत्कार सुद्धा आलेले दिसतात . एकंदरच अनेकदा नाथ संपदायात सुद्धा संपत आयात सुद्धा संप्रदायांमध्ये धर्मामध्ये आपणाला सतत अनेक नाथांचे चमत्कार सांगितले जातात याचे कारण हे लोक काही चमत्कार करू शकतात असा लोकांचा विश्वास असतो आणि लोकांचे विश्वास बसावा म्हणून काल्पनिक चमत्कार सांगितले जातात .


पाच तंत्राशी असलेले निगडित असे हे पाच आकार एकाच प्रवर्गाचे आहेत पूर्वजाचे आहेत तो पूर्वज म्हणजे महान शंकर होय .शंभू शेख हे त्यामुळेच आदिवासी लोकांचे अत्यंत आवडते व्यक्तिमत्व आहे त्याचा मूळ अर्थ सर्व शंभूंचाही शेख असा आहे कारण तो शेवटी नंतर होऊन गेलेल्या शंभूंचा म्हणजे ८४ किंवा ८८ शंभूंचा खऱ्या अर्थाने आत्ताच्या भाषेत सांगायचे तर ग्रँड फादर आजोबा आहे . महान आदी पूर्वज आहे . भारतीय संस्कृतीची सुरुवात त्याच्यापासून होते ज्यांनी ही सुरुवात विसरण्याचा प्रयत्न केला त्यांना तो अधून मधून दर्शन देत असतो . आणि पुन्हा पुन्हा आठवण करून देत असतो की मीच तुमचा बाप आहे .


श्रीधर तिळवे नाईक


Comments

Popular posts from this blog